रविकांत तुपकर अवघ्या 20 दिवसांत परतले स्वाभिमानी शेतकरी संघटनेत, राजकीय खेळीचा कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे खंद्दे समर्थक रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अवघ्या 20 दिवसांतच स्वाभिमानी पक्षात घरवापसी केली आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजी त्यंनी स्वाभिमानी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती' मध्ये प्रवेश केला होता.
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे खंद्दे समर्थक रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अवघ्या 20 दिवसांतच स्वाभिमानी पक्षात घरवापसी केली आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजी त्यंनी स्वाभिमानी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती' मध्ये प्रवेश केला होता. परंतू, ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या पक्षात परतले आहेत. कोल्हापुरात त्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यामुळे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविकांत तुपकरांचे हे घुमजाव सदाभाऊ खोत यांच्या जिव्हारी लागले आहे. रविकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा', असे रवीकांत तुपकर यांनी राजीनामा देताना म्हटले होते. बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात होते.
स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. Lok Sabha Election 2019: माढा येथून शरद पवार यांना राजू शेट्टी देणार आव्हान; स्वाभिमानीत ठराव मंजूर
स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2019 06:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

