Ravi Rana, Navneet Rana: हनुमान चालीसा पटणासाठी उद्या सकाळी 9 मातोश्रीवर; राणा दाम्पत्याची माहिती
राज्यावर असलेले संकट दूर व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हनुमान चालीसा पटण करावे. हनुमान चालीसा पटण करण्यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही.
मुंख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' (Matoshri) येथे जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) पटण करण्यावर आपण ठाम आहोत. राज्यावर असलेले संकट दूर व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हनुमान चालीसा पटण करावे. हनुमान चालीसा पटण करण्यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे आम्ही उद्या (22 एप्रिल) सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पटण करणार आहोत, असा निश्चिय आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केला आहे. मुंबई येथे खार येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हनुमान चालीसा पटण करण्यामागे आमचा कोणताच राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदू आहेत. त्यामुळे त्यांनी हनुमान चालीसा म्हणण्यास काहीच हरकत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्त्ववादी विचार ऐकूण मोठे झालो. त्याच विचारांनी उद्धव ठाकरे पुढे चालले असतील तर त्यांनी हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध करण्याचे काहीच कारण नाही. आता हीच ती वेळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्ववादी विचार कायम ठेवले आहेत की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे हे दिसून येणार आहे. राज्यात आज शेती, वीज यांसारखे अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रावरील संकट दूर करायचे अलेल तर हनुमान चालिसा पटण करण्याची गरज असल्याचेही नवनीत राणा यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena: 'मातोश्री' समोर या, शिवसैनिकांकडून महा'प्रसाद' घेऊन जा; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा राणा दाम्पत्यास इशारा)
दरम्यान, महाविकासाघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र अडचणीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला भेटत नाहीत. ते दोन दोन वर्षे मंत्रालयातही जात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रावर काय वेळ आली आहे पाहा. आदरनीय शिवसेनाप्रमुख बाळासाेहब ठाकरे आणि मातोश्री हे आमच्यासाठी आदराचे स्थान आहे. त्यामुळे आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पटण करण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता जाणार आहोत, असे आमदार रवी राणा या वेळी म्हणाले.