Ratnagiri Weather Forecast For Tomorrow: रत्नागिरी मध्ये उद्याचे हवामान कसे असेल? Meteorology Department कडून यलो अलर्ट जारी
यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
Ratnagiri Weather Prediction, June 21: रत्नागिरीमध्ये कालपासून पावसाने खूप जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनदेखील रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच खेडच्या मुख्य बाजारपेठेतही पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. आज हवामान विभागाने कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढचे येणारे 5 दिवस म्हणजेच- 20 ते 24 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीने हवामान अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर पुढचे चार दिवस संततधार पावसाची उपस्थिती पाहायला मिळेल. या भागांमध्ये आयएमडीने पावसाचा पिवळा इशारा वर्तवला आहे. दुसरीकडे, हवामान विभागाकडून आज ठाणे, पालघर, रायगड, भंडारा, नागपूरसाठीदेखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा: Heavy Rains in Thane: पहिल्याच जोरदार पावसामध्ये ठाणे, भिवंडी भागामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी (Watch Video)
रत्नागिरीचे उद्याचे हवामान कसे असेल?
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी:
रत्नागिरी मध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा आहे, त्यामुळे अगदी गरज असल्याच घराच्या बाहेर पडा. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहे. काही ठिकाणी वाहतुकीच्या समस्याही उद्भवल्या.