Ratnagiri Refinery Project: ग्रामस्थांनी ताफा आडवताच निलेश राणे म्हणाले 'हात जोडून माफी मागतो', रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत
या वेळी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. ग्रामस्थांचा रोश पाहताच निलेश राणे यांनी नरमाईची भूमिका घेत म्टले की, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मी तुमची हात जोडून माफी मागतो.'
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प (Ratnagiri Refinery Project) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) सर्वेक्षणासाठी निलेश राणे (Nilesh Rane) बारसू गावात (Barsu Village) दाखल झाले. या वेळी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. ग्रामस्थांचा रोश पाहताच निलेश राणे यांनी नरमाईची भूमिका घेत म्टले की, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मी तुमची हात जोडून माफी मागतो.' राणे समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना शिविगाळ केल्याचा ग्रामस्थांचे म्हणने होते. ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन निलेश राणे यांनी हे उद्गार काढले.
रत्नागिरीतील नाणार रिफायणरी प्रकल्पावरुन पाठीमागीलअनेक वर्षांपासून राजकारण सुरु आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचाच मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच इतर ठिकाणी उभारण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यासाठी बारसू गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठीही ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध करतानाच राणे समर्थकांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. बारसू गावात पोहोचलेल्या निलेश राणे यांना ग्रामस्थांनी ताफा अडवत जाब विचारला. या वेळी निलेश राणे म्हणाले, ''जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो.” आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, BJP Vs Eknath Shinde Group: उद्धव ठाकरे यांना मानता तर त्यांना सोडून आलातच का? निलेश राणे यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र)
निलेश राणे यांनी या वेळी सांगितले की, आपण प्रकल्पाला जो विरोध करता आहात त्यावर लोकशाही मार्गानेच तोडगा काढावा लागेल. शिवगाळ करुन फायदा नाही. आपण जो शिवीगाळ झाल्याचा आरोप करता आहात. त्यावर मी म्हणेन की, जर अशा प्रकारे आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल तर मी आपली माफी मागतो. आम्ही चर्चेला तयार आहोत. चर्चेने प्रश्न सुटू शकतो. हा विषय आता फारसा चिघळू देऊ नका, असेही ते म्हणाले.