रत्नागिरी: लहान मुलांवर 2 वर्षांपासून अनैसर्गिकरित्या लैगिंक अत्याचार करणाऱ्या एका नराधमास अटक
मात्र, आता लहान मुले देखील सुरक्षित नसल्याचे समजत आहे. खेड (Khed) येथे लहान मुलांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार (Sexual abused) केल्याप्रकरणी एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
महिलांवर होणारा अत्याचारांच्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात. मात्र, आता लहान मुले देखील सुरक्षित नसल्याचे समजत आहे. खेड (Khed) येथे लहान मुलांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार (Sexual abused) केल्याप्रकरणी एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजगुरूनगरात (Raj Gurunagar) परिसरात घडला आहे. आरोपी हा लहान मुलांना काही आमिष दाखवून त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. एका पीडित मुलाच्या आईनेच खेड पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश उर्फ काळू हरिभाऊ देशनेहेरे असे आरोपीचे नाव असून तो खेड तालुक्यातील कडूस येथे राहणारा आहे. नरेश हा गेल्या 2 वर्षापासून 9 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांना काही आमिष दाखवून हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना तो वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करत असे. हा प्रकार गेल्या 2 वर्षापासून सुरू होता. मात्र, नरेशच्या विरोधात तक्रार देण्यास कोणीही तयार नसल्याने हा प्रकारावर पडदा पडायचा. परंतु, एका पीडित मुलाच्या आईने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नरेशच्या विरोधात खेड पोलिसांत तक्रार दाखल केल. चौकशी दरम्यान नरेशने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली असून खेड पोलीस पुढील चौकशी करत आहेत. महिलांसह आता लहान मुलेही असुरक्षित असल्याचे चिन्ह दिसत आहेत. खेड परिसरात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. हे देखील वाचा- नागपूर: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हवाई सुंदरीसह एका तरुणीची सुटका
पिंपरीत गेल्या महिन्यात एका कुटूंबियांवरील केलेली करणी काढण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने त्या घरातील 5 बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आपण पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देऊ असे, कारण सांगून या भोंदूबाबाने हा घृणास्पद प्रकार केला होता. सोमनाथ कैलास चव्हाण असे या भोंदूबाबाचे नाव असून तो 32 वर्षांचा आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सोमनाथला अटक झाली आहे.