Nagpur Rape: खळबळजनक! नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवत एका तरूणीवर वारंवार बलात्कार, नागपूर येथील घटना
ही घटना नागपूर (Nagpur) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवत एका तरूणीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपीची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आहे. त्यावेळी तरूणाने तुला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत पीडिताशी जवळीक साधली. त्यानंतर वारंवार पीडिताचे लैंगिक शोषण केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. ती नोकरीच्या शोधात होती. दम्यान, तिची नोव्हेंबर 2019 मध्ये फेसबूकच्या माध्यमातून शुभम जगदीश हुड नावाच्या तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर शुभम आणि पीडिताची चांगलीच ओळख झाली. दरम्यान, शुभमने तिला एका कंपनीत कामाला लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिला कंपनी दाखवण्यासाठी घेऊन गेला. तसेच कंपनीचे काम सुरु असून लवकरच येथील कामाला सुरुवात होणार आहे. त्याच्या बोलण्यावर पीडिताने विश्वास ठेवला. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढत गेला. तसेच त्यांच्या मैत्रीचे काही दिवसाने प्रेमात लग्न रुपांतर झाले. या काळात शुभमने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला वागधरा येथील कंपनीत नेऊन तिचे शारीरिक शोषण केले. आज ना उद्या नोकरी लागेल या आशेवर इच्छा नसताना तरुणी हा अत्याचार सहन करीत होती. हे देखील वाचा- Vasai-Virar: आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकातच तुटली; नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्ष उलटली तरी आरोपीने तिला नोकरीला लावले नाही. यामुळे पीडिताने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, आरोपीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पीडिताने आपली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.