Ranichi Baug चं तिकीट आता ऑनलाईन अन घरबसल्या देखील काढण्याची सोय; पहा कुठे, कसं?
त्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. राणीच्या बागेने 2022 वर्षामध्ये 3 पेंग्विन्सचा जन्म पाहिला आहे.
मुंबई मध्ये बच्चे कंपनीसाठी आकर्षणाचं एक ठिकाण म्हणजे भायखळ्यातील राणीची बाग. 19 नोव्हेंबर दिवशी ही राणीची बाग 160 वर्ष पूर्ण करत आहे. या निमित्ताने राणीच्या बागेकडून अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo) कडून आता प्रवेशासाठी ऑनलाईन आणि घरबसल्या तिकीट बुकिंगची सोय सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांतील राणीच्या बागेला भेट देण्यासाठी येणार्यांची संख्या पाहता मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे आता पर्यटकांना तिकीटासाठी लांब रांगेत उभं राहण्याची गरज नसेल. महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते केला आहे.
ऑनलाईन तिकीटामुळे आता राणीच्या बागेत येणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यास तसेच विभागण्यास मदत होणार आहे. क्यू आर कोडसोबतच पर्यटकांना किऑस्क मशीनच्या माध्यमातून प्रिंटेड तिकिट काढता येणार आहे. राणीच्या बागेत चार ठिकाणी हे किऑस्क ठेवण्यात आले आहेत.
घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तिकिट देखील काढता येणार आहे. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकवर तुम्हांला तिकीट काढता येणार आहे.वय वर्ष 12 ते 59 साठी 50 रूपये तिकीट आहे. 3-12 वयोगटातील मुलांसाठी 25 रूपये तिकीट आहे. तर 60 वर्षांवरील आणि दिव्यांगासाठी मोफत प्रवेश आहे. राणीची बाग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुली असते. बुधवारी राणीची बाग बंद असते. मुंबई: भायखळा मधील राणीच्या बागेत Penguins नंतर आता Anacondas आणण्याची तयारी सुरू .
राणीच्या बागेमध्ये पेंग्विन पाहणं हे खास आकर्षण आहे. त्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. राणीच्या बागेने 2022 वर्षामध्ये 3 पेंग्विन्सचा जन्म पाहिला आहे.