Ram Satpute Viral Video: धर्मा माने चर्चेत, राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लिन बोल्ड

त्यामुळे 'धर्मा माने चर्चेत, राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लिन बोल्ड' अशी वेगळीच चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

Ram Satpute Assets | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माढा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांचा प्रचार करताना आमदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी वापरलेली भाषा चर्चेचा विषय ठरली. सातपुते यांनी माळशीरस तालुक्यातील कन्हेरी गावचे सरपंच धर्मा माने (Dharma Mane) यांना उद्देशून केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली. त्याचा परिणाम माढा येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyashil Mohite Patil) विजयी होण्यात झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे 'धर्मा माने चर्चेत, राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लिन बोल्ड' अशी वेगळीच चर्चा मतदारसंघात सुरु आहे. काय म्हणाले होते आमदार सातपुते आणि कोण आहेत धर्मा माने? घ्या जाणून.

राम सातपुते नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

रणजीत निंबाळकर यांच्यासाठी घेतलेल्या माढा येथील सभेत राम सातपुते यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजले. ते आपल्या पक्षाच्या एका सरपंचाला दरडावणीच्या स्वरात म्हणाले होते 'आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे. देणार ना, ए धर्मा, उठ. धर्मा माने लक्षात राहुदे, या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत. त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी मला काही माहिती नाही.' दरम्यान, पुढे सोशल मीडियावरुन बरीच टीका झाली. त्यानंतर दिलेल्या स्पष्टीकरणात राम सातपुते यांनी म्हटले होते की, मी धर्मा माने यांना दरडावत नव्हतो तर हक्काने लिड मागत होतो. माझ्या मनात कोणाला धमकावण्याचा विचार अजिबात नव्हता. (हेही वाचा, Ram Satpute Assets: ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणे! गलेलठ्ठ श्रीमंत आमदारसाहेबांनी भरला खासदारकीसाठी अर्ज)

धर्मा माने यांच्या कावाद भाजपला किती मते?

राम सातपुते यांनी ज्या धर्मा माने यांना जाहीर दरडावले त्याच धर्मा मानेच्या गावातून भाजला अत्यंत कमी मते मिळाली. त्या तुलनेत महाविकासआघाडीच्या उमेदवाराला या गावाने जोरदार लीड मिळवून दिले. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, कन्हेर हे जवळपास 4000 इतक्या लोकसंख्येचे गाव. त्या गावात लोकसभेसाठी 2500 मतदान झाले. झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला केवळ 995 तर उर्वरीत 1350 मतदान हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाले. या ठिकाणाहून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले. त्यांनी 325 मतांची आघाडी घेतली. (हेही वाचा, Ram Satpute Vs Praniti Shinde: काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पत्र, भाजप Candidate राम सातपुते यांच्याकडून 'जय श्रीराम' म्हणत प्रत्युत्तर)

व्हिडिओ

माढा लोकसभा मतदारसंघ: धैर्यशील मोहिते-पाटील यांचे मताधिक्य

करमाळा-14,500

माढा- 17,500

सांगोला- 5,600

माळशिरस-97,000

माण- 5,200

धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळालेली एकूण मते- 5 लाख 7663

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळालेली एकूण मते- 4 लाख 45 हजार 903 मतं

विजयी आघाडी- 61 हजारांहून अधिक मतांनी विजय

दरम्यान, भाजप नेत्यांमध्ये पराकोटीचा अहंकार आला होता. परिणामी महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारले. त्यामुळे जनतेने महाविकासआघाडीच्या पारड्यात आपले वजन टाकल्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते नेहमीच्या सवयीप्रमाणे आत्मचिंतन करु लागले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif