Ram Mandir Bhumi Pujan: पंकजा आणि प्रितम मुंडे यांनी गुढी उभारुन साजरा केला राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद (See Pics)
घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेवून मुंडे भगिनींनी त्याची पूजा केली.
अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिराचा (Ram Mandir) भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याने अनेक भारतीयांचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. या सोहळ्याचा आनंद देशभरात साजरा केला गेला. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांची बहिण खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी गुढी उभारुन या क्षणाचा आनंद साजरा केला. घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेवून मुंडे भगिनींनी त्याची पूजा केली. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या शेजारी गुढी उभारण्यात आली होती. या क्षणांचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी)
"वयाच्या आठव्या वर्षापासून घर परिवारात “जय श्रीराम" हा जयघोष ऐकत आले. मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य लोकांना कारसेवक म्हणून गेलेलं पाहिल, सन्मानिय अडवाणीजींची रथयात्रा पाहिली. त्यासर्वांचे प्रयत्न पूर्णत्वास घेऊन जाणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णदिन निश्चितच अभिमानाचा आहे. भारताची नागरिक म्हणून या ऐतिहासिक घटनेच स्वागत करते. जय श्रीराम !!" अशी पोस्ट करत प्रितम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रितम मुंडे ट्विट:
पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत 'जय श्रीराम !!' असं कॅप्शन दिलं आहे.
पंकजा मुंडे ट्विट:
अयोद्धेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडला. यावेळी 9 शिळांचे पूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रामादम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमन महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.