मुंबई: आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह

पीएमसी घोटाळ्यातील (PMC Scam) मुख्य आरोपी राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) (67 वर्ष) याची कोरोनाची (Coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

PMC Bank | (Photo Credits: PTI)

पीएमसी  घोटाळ्यातील (PMC Scam)  मुख्य आरोपी राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) (67 वर्ष) याची कोरोनाची (Coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आर्थर रोड जेल अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, राकेश आणि त्याचा मुलगा सारंग हे दोघे या तुरुंगात आहेत. मात्र राकेश याला प्रथम जेजे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. परंतु नंतर त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाधवान याला ताप आणि श्वास घेण्याचा त्रास घेण्यासाठी समस्या होत असल्याचे ही अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे. सारंगसह अन्य पाच जणांचा क्वारंटाइन करण्यात आले आहे.

आर्थर रोड जेलमध्ये सुद्धा कोविड19 चा शिरकाव होत 150 हून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली होती. पण सध्या तुरुंगातील परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी आहे. एचडीआयएलचे प्रमुख राकेश आणि सारंग वाधवान यांना 3 ऑक्टोबर 2019 मध्ये घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफिस विंग विभागाने त्यांना ताब्यात घेतले होते. तर सप्टेंबर महिन्यात घोटाळ्याप्रकरणी या दोघांच्या विरोधात एफआयर दाखल करण्यात आला होता.(Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 969 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 94,863 वर)

तर मंगळवारी मुंबईतील विशेष पीएमएल कोर्टाने राकेश आणि सारंग वाधवान यांचा जामीन फेटाळून लावला आहे. पीएमसी बँक संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला होता. राकेश आणि सारंग वाधवान यांच्यासह अन्य काही जणांचा सुद्धा पीएमसी बँक घोटाळ्यात समावेश आहे. पीएमसी बँकेचा 4355 कोटी रुपयांचा घोटाळा गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला होता. सध्या एचडीआयएलला दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे.