राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार

त्यानुसार, राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादीच्या कोट्यातील 4 जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने (NCP) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkari Sanghatana) विधान परिषदेवर जागा देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादीच्या कोट्यातील 4 जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना देण्यात आली आहे. राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या भेटीच्या वळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही नेतेही उपस्थित होते.

बारामतीच्या गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी राजू शेट्टी, सतीश काकडे, राजेंद्र, ढवाण आदिंची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान राजू शेट्टी यांनी आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे काकडे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी स्वत: बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती शेट्टी यांना दिली. जवळपास अडीच तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वत:च्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत सांगितले आहे. हे देखील वाचा- जळगाव: माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.