IPL Auction 2025 Live

Rajiv Gandhi Sea Link वर आजपासून टोल मध्ये वाढ; पहा नवे दर

मुंबईकर वाहन चालकांना वांद्रे वरळी सी लिंक अर्थात राजीव गांधी सागरी सेतूवर या मार्गावरून प्रवास करताना 2052 पर्यंत टोल भरावा लागणार आहे.

An image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

मुंबई मध्ये वांद्रे वरळी सी लिंक अर्थात राजीव गांधी सागरी सेतूवर प्रवास करणार्‍यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज (1 एप्रिल) पासून या मार्गावर टोलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या दरपत्रकानुसार, कार आणि लहान वाहनांसाठी 85 रूपये, मिनी बस साठी 130 रूपये तर बस आणि ट्रक चालकांसाठी 175 रूपये मोजावे लागणार आहेत. MSRDC कडून दर 3 वर्षांनी वाहनचालकांना सुविधा आणि सुरक्षा देण्याच्या कारणास्तव टोल वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार, आता कार-जीप या लहान गाड्यांच्या टोल मध्ये 15 रूपये, मध्यम वाहनांच्या टोल मध्ये 20 रूपये तर अवजड वाहनांसाठी 30 रूपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान ज्यांचे मासिक पास आहेत त्यांच्यामध्येही वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

वांद्रे-वरळी सी लिंक वर टोलनाक्यावर वसुलीची मुदत ही पूर्वी 2039 पर्यंत होती. पण आता त्यामध्ये 13 वर्ष वाढीसाठी सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे मुंबईकर वाहन चालकांना आता या मार्गावरून प्रवास करताना 2052 पर्यंत टोल भरावा लागणार आहे.Toll Rate Hike on National Highway: राष्ट्रीय महामार्गावर टोल दरवाढ, आजपासून नवे होणार लागू.

वांद्रे वरळी सीलिंक वर केंद्र सरकरच्या नियमावलीनुसार, फास्टटॅगच्या दोन्ही दिशेकडून प्रत्येकी 7 मार्गिका आहेत. तर 2 मार्गिका या रोख टोल भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई मध्ये सध्या कोविड 19 संकटामुळे अनेक खाजगी आणि सरकारी कार्यालयांनी मर्यादीत कर्मचारी वर्गासोबत काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत असल्याने पूर्वीच्या तुलनेत मागील वर्षभरापासून वाहतूक मंदावली आहे. त्याचा परिणाम देखील टोल वसुली मध्ये झाला आहे.