Rajesh Shivajirao Nagawade नागवडे नावानं ई-मेल आलाय? अजिबात उघडू नका, आगोदर Maharashtra Cyber Police काय सांगतायत ते पाहा
तो मेल तुमच्या कामाचा नाही. तो हॅकरकडून पाठविण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानातील काही हॅकर्सनी हा मेल भारतातील अनेक लोकांना पाठवला आहे.
सावधान! तुम्हाला राजेश शिवाजीराव नागवडे (Rajesh Shivajirao Nagawade) नावानं ई-मेल (e-mail) आलाय? आला असेल तर धोका ओळखा. तो मेल तुमच्या कामाचा नाही. तो हॅकरकडून पाठविण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानातील काही हॅकर्सनी हा मेल भारतातील अनेक लोकांना पाठवला आहे. या हॅकर्सनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचा (Maharashtra Cyber Police) पूर्वीचा ई-मेल आयडी हॅक केला आहे. त्याच मेल आयडीवरुन हा मेल अनेकांना पाठवला गेला आहे. त्यामुळे तुमच्याही इनबॉक्समध्ये हा मेल आढळला तर तो उघडू नका. या मेल आयडीवरुन Terrorist Behind JK Attack Gunned Down In Mumbai असा आशय असल्याचा फिशींग मेल काही ठिकाणी पाठवला गेल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.
राजेश शिवाजीराव नागवडेps.mummahapolice.gov या मेल आयडीवरुन शासकीय विभागातील ईमेल आयडीवर फिशिंग मेल हॅकर्सनी डिलिव्हर केले आहेत.राजेश शिवाजीराव नागवडे नावाने आलेला मेल म्हणजे युजर्सच्या म्हणजेच तुमच्या मेल आणि गॅझेटमधील सिस्टमचा पासवर्ड मिळविण्याचे एक साधन आहे. त्यामुळे एकदा का तुमचा पासवर्ड हॅकर्सच्या हातात पडला की, तुमची व्यक्तीगत माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचलीच म्हणून समजा. त्यामुळे मुळात हा ईमेल उघडूच नका. तसेच त्यात असलेल्या पीडिएफ फाईलला तर हातच लाव नका, असे मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Police: मुंबई सायबर पोलिसांकडून Whatsapp वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा; वाचा सविस्तर)
महाराष्ट्र सायबर विभागाचे एसपी संजय शिंत्रे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाची राज्याच्या सायबर सेलने गंभीर दखल घेतली आहे. हॅकर्सनी पाठवलेल्या एका मेलसोबत एका इंटेलिजन्स रिपोर्ट नावाने एक पीडीएफ फाईलही जोडली जात आहे. ती फाईल ओपन केल्यास युजर्सचा डेटा चोरी होऊ शकतो. राज्य सायबर सेलने सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना अशा प्रकारचा कोणताही मेल आल्यास तो उघडला जाऊ नये अशा सूचना दिल्याचेही एसपी शिंत्रे यांनी सांगितले.