मुंबई: उद्धव ठाकरे, अशोक गहलोत या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक; 'मातोश्री' येथे चर्चा
या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. या सर्व पार्श्वभूमिवर ठाकरे आणि गहलोत यांच्या भेटीबाबत सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीवेळी पर्यटन मंत्री (Tourism Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेसुद्धा उपस्थित होते.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांनी आज (6 जानेवारी 2020) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवसस्थान मातोश्री येथे ही भेट झाली. राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजयवारु रोखत काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री म्हणून या सरकारचे नेतृत्व अशोक गहलोत करत आहेत. गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सल्लागार आणि अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर, महाराष्ट्रातही भाजपला धोबीपछाड देत महाविकाआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. या सर्व पार्श्वभूमिवर ठाकरे आणि गहलोत यांच्या भेटीबाबत सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीवेळी पर्यटन मंत्री (Tourism Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेसुद्धा उपस्थित होते.
अशोक गहलोत आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील तपशील अद्याप बाहेर आला नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दुपारी 1 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या भेटीबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, ही भेट काही फार मोठी नव्हती. अशोक गहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. ते काही कामानिमित्त मुंबई येथे आले होते. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ही भेट झाली. (हेही वाचा, जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ला 26/11 च्या घटनेची आठवण करुन देणारा: उद्धव ठाकरे)
अशोक गहलोत
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असे पत्रकारांनी खोदून विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाला मिश्कीलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, नवीन वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे मी गहलोत यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी मला दिल्या. राजकाणामध्ये सर्वजनच एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे आमचीही तशीच भेट झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.