Rajarambapu Sahakari Bank ED Raids: जयंत पाटील यांच्याशी संबंधीत बँकेवर ईडीचे छापे, पश्चिम महाराष्ट्रात खळबळ; 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राजारामबापू सहकारी बँकेवर (Rajarambapu Sahakari Bank) ही कारवाई करण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील नामवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारी बँकेवर धाड (ED Raids) टाकली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राजारामबापू सहकारी बँकेवर (Rajarambapu Sahakari Bank) ही कारवाई करण्यात आली आहे. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधी असल्याने राजकीय वर्तुळातही या धाडीची जोरदार दखल घेण्यात आली असून, उलटसुलट चर्चा सुरु आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. लाईव्ह दिलेल्या या वृत्ता, ही धाड सुमारे 10 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
राजारामबापू सहकारी बँकेचे मुख्य (Rajarambapu Sahakari Bank) कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 ठिकाणी ही धाड टाकण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, साधारण 10 वर्षांपूर्वी बँकेत 1000 कोटी रुपयांचा कथीत घोटाळा झाला. आर्थिक गैरव्यवहाराचा संश असलेल्या या प्रकरणात इडीने लक्ष घातले असून, तपास सुरु आहे. बँकेमध्ये काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम वळती केली असा आरोप असून या प्रकरणात ईडीलाही काही संशय आहे. परिणामी तपास सुरु आहे. (हेही वाचा, ED Summons Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ची नोटीस)
दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडून व्यवहार झाला आहे. बँकेला याबाबत माहिती असतानाही बँकेने ही माहिती दडवून ठेवली, असा आरोप आहे. या प्रकरणात बँकेचे अनेक अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या या बँकेच्या सीएच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला असल्याचे समजते.