Maharashtra: जातीवादीच्या मुद्द्यावरून मनसे- राष्ट्रवादीत संघर्ष पेटला, शरद पवार यांच्या टीकेला राज ठाकरे यांचे प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील (Maharashtra) जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जबाबदार धरले होते.
महाराष्ट्रातील (Maharashtra) जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जबाबदार धरले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचे वाचन करण्याचा सल्ला दिला होता. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध? हे मला समजावून सांगावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी प्रबोधन ठाकरे यांचे पुस्तक वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण यांचेही पुस्तक वाचले आहेत. मात्र, मी केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार साहेबांनी मला समजावून सांगावे. मी एका चॅनलला दिलेल्या मुलाखातीत आपण 75 वर्षांमध्ये काय कमावले आण काय गमावले? याचा अहापोह त्या होता. आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारला आहे. हे देखील वाचा- 'राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी...'; अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज ठाकरे काय म्हटले होते?
राज ठाकरे यांनी गुरुवारी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखातीत त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.
"राज ठाकरे यांच्यावर न बोललेलेच बरे’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यासोबतच, ‘राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे,’ असा सल्ला शरद पवारां यांनी दिला होता.