Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्‍यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार

9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदा पक्षाच्या वर्धापनदिनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे.

MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: ANI)

कोविड 19 नंतर हळूहळू सामन्य होत असलेली स्थिती पाहता आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा जोश भरण्यासाठी मेगा प्लॅन बनवला आहे. आज मुंबई येथे एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसेच्या बैठकीनंतर नेते बाळा नांदगावकर (Bala Nanadgaokar)  यांनी मनसेचा मेगा प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  1 ते 9 मार्च दरम्यान एक दिवस अयोद्धेचा दौरा (Ayodhya) करणार असल्याचंदेखील सांगितलं आहे. 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदा पक्षाच्या वर्धापनदिनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे. (नक्की वाचा: Raj Thackeray यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाचं वॉरंट जारी; 6 फेब्रुवारीला कोर्टात व्हावं लागणार हजर)

मनसे कडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा

दरम्यान आजच्या मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांची सून मिताली बोरूडे ची देखील पहिल्यांदाच उपस्थिती पाहून अनेकांचे तिने लक्ष वेधले होते. अमित ठाकरे यांना पक्षात नेते पद दिल्यानंतर वर्षाचा काळ लोटल्यानंतर आता त्यांच्यावर कोणती मोठी दिली जाणार का? अशा शक्यतांबद्दलही चर्चा व्हायला लागली होती.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार मनसेची सर्व महापालिका स्तरावर एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.