Raj Thackeray Releases MNS Manifesto: आम्ही हे करू! राज ठाकरेंकडून मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहेत खास घोषणा? जाणून घ्या
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि औद्योगिक वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
Raj Thackeray Releases MNS Manifesto: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आपल्या पक्षाचा जाहीरनामा (MNS Manifesto) प्रसिद्ध केला आहे. 'आम्ही ही करू' असे शीर्षक असलेल्या जाहीरनाम्यात राज्याच्या भविष्यासाठी अनेक प्रमुख मुद्दे आणि योजनांची रूपरेषा देण्यात आली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि औद्योगिक वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
मनसेच्या जाहीरनाम्यात मुलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांवर भर -
पक्षाचे प्राधान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे आहे. मनसेच्या जाहीरनाम्यात महिला कल्याण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार यासह विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मनसेचा जाहीरनामा हा विचारपूर्वक मांडलेला दस्तऐवज आहे. तसेच या जाहीरनाम्यात जनतेच्या प्रश्नांवर व्यावहारिक उपाय आहेत, असा दावाही यावेळी राज ठाकरे यांनी केला. (हेही वाचा - MNS Shivaji Park Rally Cancelled: मनसे कडून शिवाजी पार्क वरील 17 नोव्हेंबरची जाहीर सभा रद्द; मनसे अध्यक्षांनी कारणाचा केला खुलासा)
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय म्हणाले राज ठाकरे? पहा व्हिडिओ -
आम्ही महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी सविस्तर योजना आखल्या आहेत. यातून खरा बदल घडेल, या विश्वासाने मी हा जाहीरनामा सादर करत आहे, असेही राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे.