IPL Auction 2025 Live

मुंबईतील मोठा प्रकल्प Adani Group कडेच का? Raj Thackeray यांचा सवाल; 'मविआ'च्या मोर्चा वर टीपण्णी

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) अदानींकडे गेल्यानंतर काही दिवसांपूर्वी मविआ ने मुंबई मध्ये मोर्चा काढला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या मोर्चा मध्ये सहभाग घेतला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आता Adani Group कडेच मुंबईतील मोठे प्रकल्प कसे जातात? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्यामध्ये असे काय आहे, की विमानतळापासून कोळशापर्यंत सारंचं त्यांना कसं मिळतं? असा सवाल केला आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी मविआ च्या मोर्च्यावर देखील टोमणा मारला आहे. "कंत्राट काढून 10 महिने उलटल्यानंतर यांचा मोर्चा निघतोय मग सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा." असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पुनर्विकास प्रकल्प मध्ये प्लॅन असतो. त्यामध्ये शाळा किती येणार, कॉलेज पासून ओपन स्पेस पर्यंत अनेक गोष्टी असतात. त्यांचे काय होणार? हे त्यांनी ठरवलं आहे का? असंही त्यांनी विचारलं आहे. आता मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? असा थेट सवाल त्यांनी मविआ च्या नेत्यांना केला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे गेल्यानंतर मविआ कडून त्याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी अदाणी समूहासह महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान आज राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी  मनसे नेत्यांसोबत बैठकीला आले होते. मनसेकडून चाचपणी सुरू असून कोणते मतदारसंघ लढवायचे त्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. अशी माहिती दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अदानी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प बाबतच्या प्रश्नांवर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.