Raj Thackeray On Architecture: बेडरुममध्ये पकडापकडी खेळायची की बाथरुममध्ये धावतपळत आंघोळ करायची? राज ठाकरे यांचा सवाल
जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर लेखक दीपक करंजीकर यांनी याज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
Raj Thackeray City Planning: नगररचना आणि शहरांचा विकास यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या खास शैलीत मिष्कील टिपण्णी केली आहे. जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त (World Architect Day) शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर लेखक दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांनी याज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्याकडे नगररचना, वास्तुशास्त्र याचे कोणालाच भान नाही. राज्य सरकारकडे पैसा असतो, ते पैसा ओततात आणि इमारती उभा राहतात. यात फक्त इंजिनीअर द्वारे तांत्रिक गोष्टी पाहिल्या जातात. बाकी काही नाही. कोणालाही काहीही वाटेल तशी इमारत उभी केली जाते. या वेळी ठाकरे यांनी बीड येथील सर्कीट हाऊसचा दाखला दिला. ते म्हणाले, त्या सर्कीट हाऊसमध्ये एक बेडरुम आहे. तिथे भलामोठा हॉल आहे. ज्यात बरोबर मध्यभागी बेड आहे. आता नवदाम्पत्याने तिथे जाऊन काय पकडापकडी खेळायची? आपल्याकडे सरकारी इमारतींमध्ये भलीमोठी बाथरुम असतात.. आता तिथे काय धावत धावत आंघोळ करायची काय?
शहरं आणि गावांतील परिसर स्वच्छतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, आपले दुर्दैव आहे की, ज्या राज्यात संत गाडगेबाबा जन्माला आले त्यांच्या राज्याला स्वच्छतेबद्दल सांगावे लागते. आपण आपल्या परिसराचा जरी अभ्यास केला तो स्वच्छ ठेवला तरी बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. आपल्याकडे दृष्टीकोणाचा प्रचंड आभाव आहे. महापालिकांमध्यून शहरांचा विकास (Development Planning) होतो पण शहर नियोजन (Town Palnning) नावाचा प्रकारच नसतो. कोणत्याही शहराचे नियोजन करायचे तर तो सौदर्यवाद हा पहिल्यांदा सत्तेत असावा लोगतो. तरच तो मग पुढे खाली झिरपत जातो. आपल्याकडे त्याचाच अभाव असल्याने सगळी गोची आहे. महापालिका विभागामध्ये इंजिनिअर्स असतात टाऊन प्लॅनर नसतात, त्यामुळेच सगळा घोळ होतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, नागरिकांनी संसद, विधीमंडळ, नगरालिसा, महापालिका, खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्या जबाबदाऱ्या काय याबाबत जागरुक असले पाहिजे. आपल्याकडे रस्त्याकडेच्या बाकांवरही खासदार, आमदारांच्या सौजन्याने असे लिहिलेले असते. खरेतर ते त्याचे कामच नसते. त्याचे काम असते समाजातील विविध गोष्टींचा अभ्यास करुन त्याबाबत कायदे तयार करणे. पण आपल्याकडे कायदे तयार करणे सोडून बाकिच्याच गोष्टींमध्ये ही मंडळी गुंतलेली असतात. नागरिकांनीही आपली कामे घेऊन जात असताना ती कोणत्या दर्जाची आहेत हे तपासून पाहिले पाहिजे, असे सांगतानाच राज ठाकरे असेही म्हणाले की, माझ्या हाती सत्ता आली तर विकास होईल. परंतू, पहिल्यांदा आर्किटेक्चरचा सल्ला घेतला जाईल. मग पुढे ते इंजिनिअरकडे पाठविण्यात येईल.