मनसे पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार? पुणे येथे बैठक सुरु

तर आजपासून पुढील तीन दिवस राज ठाकरे पुणे (Pune) येथे दौऱ्यावर आहे

Raj Thackeray (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thckeray) यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) हालचाली सुरु केल्या आहेत. तर आजपासून पुढील तीन दिवस राज ठाकरे पुणे (Pune) येथे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी रणनिती ठरवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचसोबत मनसे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे आज पासून पुण्यात दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बैठकीत राज्यभरातील ताकदींचा अंदाज घेतला जाणार आहे. त्याचसोबत यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजप पक्षाला मिळालेल्या बहुमताबद्दल चर्चा करण्यात येणार आहे.

(मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला, विधानसभेच्या कामांसाठी हालचाली सुरु)

पुण्यात सुरु असलेल्या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आला आहे. तर सर्वांचे मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगितल्याने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे.