लक्ष्मीपूजन : मोदी, फडणवीस, गडकरींवर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून टिकास्त्र

लक्ष्मीपूजनाचे निमित्त साधत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

राज ठाकरे, नरेंद्र मोदी (Photo Credit : Facebbok & Getty)

राज ठाकरेंनी दिवाळी निमित्त सुरु केलेल्या व्यंगचित्र मालिकेतील नवे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाचे निमित्त साधत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. नरक चतुर्दशी : राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर व्यंगचित्रातून टीका

या व्यंगचित्रात मोदी, गडकरी आणि फडणवीसांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या फोटोसमोर सात्क्षात लक्ष्मी उभी आहे आणि ती म्हणते की, "बाबांनो, गेल्या चार साडेचार वर्षात तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे." पाहा : राज ठाकरेंचं धनत्रयोदशीनिमित्त साकारलेले व्यंगचित्र.

गेल्या चार साडेचार वर्षात मोदी आणि गडकरी यांनी देशात तर फडणवीसांनी राज्यात विकासासाठी इतके मोठे पॅकेज देऊ, असा विकास करु आणि अशा बऱ्याच घोषणा दिल्या. या घोषणांवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीकास्त्र सोडले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement