Maharashtra Political Updates Today: राज ठाकरे मनसे गुढीपाडवा मेळावा, MVA पत्रकार परिषद; राज्यातील प्रमुख राजकीय घडामोडी, घ्या जाणून
मराठी नववर्षाचा प्रारंभ (Start of Marathi New Year). नववर्षानिमित्त महाराष्ट्राच्या घराघरात आनंदी आणि उत्साही वातावरण असले तरी राजकीय वर्तुळात मात्र लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात हालचाली घडत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 2024: आज गुढीपाडवा (Gudi Padwa 2024). मराठी नववर्षाचा प्रारंभ (Start of Marathi New Year). नववर्षानिमित्त महाराष्ट्राच्या घराघरात आनंदी आणि उत्साही वातावरण असले तरी राजकीय वर्तुळात मात्र लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात हालचाली घडत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. खास करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आणि महाविकासआघाडीतील घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद (MVA Press Conference). या दोन्ही गोष्टींकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण या दोन्ही घटनांचा राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्याही राजकीय वर्तुळावर मोठा प्रभाव पडणार आहे.
महाविकासआघाडी पत्रकार परिषद
महाविकासआघाडीतील घटक पक्ष शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस यांची एक संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडणार आहे. महाविकासआघाडीचे जागावाटप आणि काही जागांवरुन उद्भवलेला वाद, त्यावरुन प्रमुख नेत्यांची आलेली परस्परविरोधी विधाने आणि इतर काही बाबींवरुन ही पत्रकार परिषद अतिषय महत्त्वाची ठरणार आहे. बोलले जात आहे की, सांगली, भिवंडी आणि मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निर्माण झालेला तिढाही सोडवाला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून होणारी लढत कशी असेल याबाबत उत्सुकता आज संपण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, MNS Gudipadwa Melava 2024: मनसे-भाजप युती? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे घोषणा करण्याची)
मनसे गुढीपाडवा मेळावा
राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबई येथे पार पडणार आहे. या मेळाव्याकडेही राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यात भेटीगाठी होत आहेत. राज ठाकरे यांचा दिल्ली दौराही झाला. या दैऱ्यात त्यांची आणि भाजप नेते अमित शाह यांचीही भेट झाली. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनीही सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील प्रमुख विद्यमान नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल एक सूचक विधान केले. राज ठाकरे हे भाजप आणि हिंदुत्त्वाशी अनुकुल भूमिका घेतील अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात काय भूमिका घेतात. भाजपशी युती करुन महायुतीचा घटक पक्ष होण्याचा निर्णय घेतात का याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबतही उत्सुकता आहे. (हेही वाचा, MNS Gudhi Padwa Sabha Teaser: मनसेचा गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च; 9 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार)
देशभरातील वातावरण लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे.