Raj Thackeray : नाशिकमध्ये राज ठाकरेंचे बॅनर फाडले; मनसैनिक संतप्त

त्यामुळे मनसैनिकांकडून नाशकात अनेक ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही अज्ञातांनी राज यांचे बॅनर फाडेल आहेत. त्यामुळे मनसैनिक संतप्त झाले आहेत.

Raj Thackeray | (Photo Credit : File Image)

Raj Thackeray: नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापनदिन (MNS Vardhapan Din) साजरा होणार आहे. यानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray)तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज ठाकरेंचे बॅनर फाडल्याचा प्रकार घडला आहे. रात्री राज यांचे बॅनर फाडण्यात (Raj Thackeray banner torn)आले. काळाराम मंदिर परिसरातून ही घटना समोर आली आहे. बॅनर कोणी फाडले हे समोर आलेलं नाही. मात्र, यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा: Raj Thackeray Pune Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर संतापले, विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना)

राज ठाकरे हे आज सायंकाळी नाशिकला येणार आहेत. ते उद्या सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देतील आणि महाआरती करतील. त्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. बुधवारी या परिसरात राज ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले होते. गुरुवारी सकाळी हे बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले. बॅनर कोणी आणि का फाडले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.(हेही वाचा: Raj Thackeray on Marathi Manoos: रायगड आपला राहणार नाही, लाचार नेते मिंधे झाले, सतर्क राहा; राज ठाकरे यांचा इशारा) 

राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात राज ठाकरे श्रीरामाचे दर्शन आणि महाआरती करणार आहेत. तसेच उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. पक्षबांधणी मजबूत करण्यावर ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. 9 मार्चला नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होईल. आगामी लोकसभेचे रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार आहे. मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, नाशकात राज ठाकरेंची क्रेझ कमालीची आहे. एकेकाळी राज यांनी स्वबळावर राज्यात १३ आमदार निवडून आणले होते. त्यातले ३ आमदार नाशिक मधले होते. नाशिक राज ठाकरेंचा बाले किल्ला मानला जातो.