ऑडीओ क्लिपद्वारे राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन; 'गाफील राहू नका, स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या' (Listen Audio Clip)
लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सर्वच पक्षांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे (MNS) पक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वार वाहत आहे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सर्वच पक्षांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे (MNS) पक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मतदानाला काही दिवस राहिले असताना, निवडणुकीला जाण्यापूर्वी स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या अशा शब्दांत राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावरवर एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे ज्याद्वारे जनतेने गाफील राहू नये असा संदेश त्यांनी दिला आहे.
ऐका राज ठाकरे यांची ऑडिओ क्लिप -
येत्या 21 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. मतदानाला जाण्यापूर्वी जनतेने आपले हे आवाहन ऐकावे अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांवर हल्ला चढवत राज ठाकरे म्हणतात, 'पुन्हा एकदा एकमेकांवर कुरघोड्या करणे, जाहीरनामे, वचननामे सुरु झाले आहेत. निवडणुकीपूर्वी मतदाराला राजा बनवायचे मात्र निवडणुकीनंतर त्याच्याकडे पहायचेही नाही अशी स्थिती आहे. मात्र यावेळची परीस्थिती गंभीर आहे. सध्याच्या सरकारमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, रोजगार गेले, कारखाने बंद पडले, नवीन नोकऱ्या नाहीत, वाहतूक व्यवस्था मृत्यूचा सापळा बनत आहे, बँकांना अचानक टाळे लागले. विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवण्याचे काम केले नाही. त्यामुळे आता तुम्ही गाफील राहू नका, स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या आणि मनसेला मत द्या'. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा प्रचारासाठी राज ठाकरे यांची रस्त्यावर सभा घेण्याची मागणी; निवडणूक आयोगाला पाठवले पत्र)
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जवळ जवळ प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उतरवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आव्हान निर्माण केले आहे. प्रचारासाठी राज ठाकरे यांनी स्वतः सभांचा दौरा सुरु केला आहे. तसेच मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी अशा प्रकारे सोशल मिडीयाचाची आधार घेतला जात आहे. सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2019 06:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

