महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, आज आणि उद्या मुंबईत तुरळक सरी कोसळण्याची शक्यता
त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून पुरस्थिती पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोर धरला होता. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून पुरस्थिती पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच पश्चिम किनारपट्टी, कोकण आणि मुंबईत पावसाच्या आज आणि उद्या तुरळक सरी कोसण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यभरात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. परंतु अतिमुसळधार पाऊस गेल्या दोन दिवसापासून झालेला नाही. तर आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही ठिकाणी ही पाऊस पडणार आहे.(मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने गडचिरोलीत पुरस्थिती, भामरागड 70 टक्के पाण्याखाली)
तसेच 14 सप्टेंबरला कोकण, गोवासह अन्य ठिकाणी पाऊस पडणार आहे. परंतु गडचिरोली येथे मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भामरागड 70 टक्के पाण्याखाली गेल्याची सध्याची स्थिती आहे. मात्र या ठिकाणी पुरस्थिती निर्माण होऊन ही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.