मुंबई: मध्य, पश्चिम, हार्बर लाईन मार्गावर आज मेगाब्लॉक; पहा संपूर्ण वेळापत्रक

रेल्वे प्रशासनाने मुंबई लोकल (Mumbai Local) तिन्ही मार्गावरील तांत्रिक कामासाठी आज रविवारी (Sunday Mega Block) मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर लाईन (Harbour Line) मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.

मुंबई: मध्य, पश्चिम, हार्बर लाईन मार्गावर आज मेगाब्लॉक; पहा संपूर्ण वेळापत्रक
Megablock (Photo Credits:Twitter)

रेल्वे प्रशासनाने मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिन्ही मार्गावरील तांत्रिक कामासाठी आज रविवारी (Sunday Mega Block) मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर लाईन (Harbour Line) मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. यानुसार मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान लोकल धावणार नाहीत, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशीदरम्यान आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. याबरोबच रविवारी मध्यरात्री वसई रोड-भाईंदर स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेवर (Western Railway) जंबो ब्लॉक (Jumbo Block) असणार आहे. या कारणाने आज मुंबई लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. दरम्यान, मेगाब्लॉकची माहिती नसणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अधिकच हाल होतात. पुढील माहितीमुळे अशा रेल्वे प्रवाशांना त्यांचा महत्वाचा वेळ वाचवता येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे वर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर साक्ली 11.20 पासून ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर फिरवण्यात येतील तर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात गाड्या थांबणार नाहीत. या प्रवाशांना एकाच तिकिटावर घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथून प्रवास करता येणार आहे. सर्व लोकलच्या फेऱ्या या साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने असणार आहेत.

ट्वीट-

हार्बर रेल्वे

उद्या सकाळी 11.30 ते सुपारी 4 दरम्यान पनवेल- वाशी अप तसेच डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी वरून बेलापूर व पनवेल येथे जाणाऱ्या तसेच अप मार्गावरून सीएसएमटी कडे येणाऱ्या लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पनवेल - अंधेरी लोकल देखील बंद असतील. प्रवाहांच्या सोयीसाठी सीएसएमटी - वाशी ही विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

ट्रान्स हार्बर रेल्वे

ट्रान्स हार्बर अप व डाऊन मार्गावरील ठाणे ते पनवेल या स्थानकांच्या दरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी पनवेल- ठाणे अप डाऊन फेऱ्या बंद असतील. मात्र ठाणे- वाशी- नेरुळ दरम्यान लोकलसेवा सुरु असणार आहे

ट्वीट-

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 3 ते पहाटे 4 च्या दरम्यान वसई रोड ते भाईंदर स्थानकाच्या मध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकच्या कालावधीत सर्व मार्गांवर काही लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत तर काही ठिकाणी लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरानं धावणार आहेत. या वेळी प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचे प्लॅनिंग करावे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2019 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).