Railway Accident: धावत्या ट्रेनमधून नदीत कोसळल्याने 18 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, भंडारा येथील घटना
धक्कादायक म्हणजे बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या आईचाही नदीवरच्या पुलावर पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील देव्हाडा-माडगी वैनगंगा नदी (Wainganga River) पुलावर घडली.
धावत्या ट्रेनमधून (Railway Accident at Bhandara) नदीत पडल्याने 18 महिन्यांच्या लहना बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू (Railway Accident) झाला आहे. धक्कादायक म्हणजे बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या आईचाही नदीवरच्या पुलावर पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील देव्हाडा-माडगी वैनगंगा नदी (Wainganga River) पुलावर घडली. पूजा इशांत रामटेके (वय 27 वर्षे, रा. टेकानाका, नागपूर) असे घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या बाळाचे नाव समजू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार, इशांत रामटेके (रा. टेकानाका, नागपूर) हा सैनिक शाळेत शिक्षक असलेला व्यक्ती पत्नी पूजा आणि आपल्या 18 महिन्यांच्या बाळासह रेल्वेप्रवास करत होता. हा आपल्या कुटुंबासह नागपूर येथून रेल्वेने रेवा येथे जाण्यसाठी निघाला. रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना गाडी तुमसर रेल्वे स्थानकावरुन निघाली. दरम्यान, आपल्या पतीला संगून पूजा ही आपल्या बाळासह रेल्वेतील स्वच्छतागृहाकडे गेली. दरम्यान, स्वच्छतागृहाकडे जात असतान तिचा 18 महिन्यांचा बाळ अचानक चालत पुढे गेला. गाडीचा दरवाचा उघडा असल्याने तो खाली पडला. त्यातच गाडी देव्हाडा-माडगी वैनगंगा नदी पुलावरुन जात असल्याने हा बाळ थेट पाण्यात पडला. बाळाला पुढे जाताना पाहून आई पूजा हीदेखील त्याच्यापाठोपाठ धावली. मात्र तीचाही तोल जाऊन ती खाली पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, पत्नी पूजा आणि बाळ बराच वेळ झाले तरी परत न आल्याने पती इशांत याने खूप शोधाशोध केली. मात्र, पत्ता न लागल्याने त्याने पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार गोंदिया येथ केली. दरम्यान, रेल्वे कर्मचारी रेल्वेरुळावर पेट्रोलिंग करताना सोमवारी त्यांना एका महिलेचा मृतदेह पुलाला लटकत्या आवस्थेत मिळाला. तर बाळाचाही मृतदेह पाण्यात आढळून आला. कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली असता रेल्वे पालीस आणि करडी पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला असता हा मृतदेह पूजा रामटेके यांचा असल्याचे पुढे आले. इशांत रामटेके यांनीही दोन्ही मृतदेह ओळखले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा, Train Accident: तेलंगणामध्ये पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव, घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
या घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि करडी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठवण्यात आले. पुढील तपास करडी पोलीस करत आहेत