रोहा येथील कुंडलिका नदीत तीन जण बुडाले, तरुणांचा मृत्यू
रोहा येथील कुंडलिका नदीत तीन जण बुडाले
रोहा (Roha) येथे मुंबईतून (Mumbai) फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुण बुडाले असल्याची घटना घडली आहे. तर या तीन जणांचा बचाव करण्यासाठी कार्य सुरु होते. मात्र तिघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहा येथे राहणारा संकेत पवार याचे मुंबईतील काही मित्र तेथे फिरण्यासाठी आले होते. तर दुपारीच्या वेळेस नदीत पोहण्यासाठी तीन जणे गेले. मात्र 28 जणांच्या या ग्रुपमधील 3 जण बुडाले आहेत.
(केईएम हॉस्पिटल मधील 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु)
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर राफ्टिंग पथक आणि बचाव पथकाकडून सुध्दा या तिघांचा शोघ घेतला जात होता. यामुळे सर्वत्र परिसरात शोककळा पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2019 02:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

