रायगड MIDC मध्ये बॉयलर सिलेंडरचा भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 16 जखमी

या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 16 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

cylinder blast | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एका कंपनीत बॉयलर सिलेंडरचा मोठा स्फोट (cylinder blast) झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 16 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीत (CRYPTZO Engineering Company) ही घटना घडली. (हेही वाचा - शाळेत जाण्यासाठी बाईक दिली नाही म्हणून पोलीस कर्मचारीच्या मुलाने शाळेतच स्वत:ला घेतले पेटवून)

या स्फोटात जखमी झालेल्या 18 कामगारांपैकी आशिष येरुनकर आणि राकेश हळदे या दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर नवी मुंबईतील 'नॅशनल बर्न सेंटर'मध्ये उपचार सुरू होते. यातील 5 कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या स्फोटामुळे कंपनीतील कामगारांचे डोळे गेल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआय ट्विट - 

हेही वाचा - मुंबई: बेपत्ता मुलीच्या वडीलांची आत्महत्या; चेंबूर परिसरात जमावाकडून दगडफेक

या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या स्फोटाचा आवाज ऐकून कंपनी जवळच्या परिसरातील कामगारांचा एकच गोंधळ उडाला होता. या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगावले, सहपोलीस निरीक्षक प्रियांका बुरुंगले, पोलीस स्वप्निल कदम आणि इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.