Lockdown: रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन; 15 ते 24 जुलै दरम्यान पाळणार कडकडीत बंद- आदिती तटकरे
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी हा लॉक डाऊन (Lockdown) घोषित केला आहे.
Coronavirus In Raigad: रायगड (Raigad) जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला असता आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी येत्या बुधवार पासून पून्हा एकदा लॉक डाऊन (Lockdown) घोषित केला आहे. आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. बुधवार 15 जुलै मध्यरात्री 12 वाजल्यापासून 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन मधून शेती कामांना सूट देण्यात आली आहे. या सोबतच अलिबाग (Alibaugh) मध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे असेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाचे 6,497 नवे रुग्ण, 193 मृत्यू; 4,182 जणांनी कोरोनावर मात करून केली घरवापसी ; 13 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
प्राप्त माहितीनुसार, रायगड मध्ये आताच्या घडीला कोरोनाचे एकूण 8217 संक्रमित रुग्ण आहेत यापैकी 338 जणांचा आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत तर 4042 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रायगड मधील कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे आणि हीच बाब लक्षात घेता वेळीच हा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड प्रमाणेच, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यात सुद्धा हा संपूर्ण आठवडा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुद्धा 19 जुलै पर्यंत लॉक डाऊन आहे. मुंबई मध्ये मात्र परिस्थिती नियंत्रणात असून 100 टक्के लॉक डाऊनची आवश्यकता नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी दिली आहे.