Rahul Gandhi on PM Narendra Modi: राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मदी यांना थेट आव्हान, 'मी तुमच्या ईडीला घाबरत नाही, काय करायचं ते करा'
काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महागाईवर हल्लाबोल' यात्रेदरम्यान ते दिल्ली येथे बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले.
काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत थेट आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महागाईवर हल्लाबोल' यात्रेदरम्यान ते दिल्ली येथे बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मदी यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले, 'मी तुमच्या ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि तत्सम यंत्रणांना घाबरत नाही. काय करायचे ते करा. माझी 5 तास, 50 तास अवा 500 तास चौकशी करा. मला फरक पडत नाही. हा देश संविधानावर आधारलेला आहे आणि तो एकसंध राहावा यासाठी मी प्रयत्न करेन.'
राहुल गांधी यांनी म्हडले की, देशात एकमेकांबद्दल तरस्काराचे (नफरत) वातावरण निर्माण खेले जात आहे. तिरस्कार पसरवून देशातील संविधानच संपुष्टात आणायचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता विरोधकांना थेट जनतेजवळ जाऊन आवाज उठविण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लख राहिला नाही. त्यामुळेच काँग्रेस येत्या 7 सप्टेंबर पासून 'भारत जोडो' यात्रा काढत आहे. (हेही वाचा, Congress: महागाई विरोधात कॉंग्रेसचा एल्गार, दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल)
'नॅशनल हेरॉल्ड' संबंधित कथित निधीसंकलन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) द्वारा झालेल्या चौकशीचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजून घ्यायला हवे की, मी ईडीला घाबरणारा नाही. राहुल गांधी यांनी म्हटले की, जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून देशात नफरत आणि क्रोध वाढला आहे. ज्याला भीती वाटते त्याच्याच मनात तिरस्कार निर्माण होतो. जो घाबरत नाही त्याच्या मनात तिरस्कार असत नाही. देशात भविष्यात महागाई आणि बेरोजगारी याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे समजात तिरस्कारही वाढतो आहे. तिरस्कारामुळे लोक एकमेकांमध्ये विभागले जातात आणि देश कमजोर होतो. भाजप आणि आरएसएस देशाला विभागते आणि त्यांच्यात जाणीवपूर्वक भीती निर्माण करतो.
ट्विट
घरगुती गॅस, डीझेल आणि स्वयंपाकघरातील वस्तूच्या भाववाढीचा दाखला देत राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी सांगतात की, 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले. आम्ही सांगतो की, काँग्रेसने इतकी महागाई कधीच वाढवली नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले की,नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. परंतू ते दोन उद्योगपतींच्या मदतीशिवाय पंतप्रधान होऊ शकत नाहीत. प्रसारमाध्यमांच्या सहकार्याशिवाय ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यांचा सर्व घटनात्मक संस्थांवर दबाव आहे. हे सरकार त्यां संस्थांवर आक्रमण करत आहे. विरोधी पक्षाकडेही कोणता रास्ता नाही. त्याुमुळे त्यांना आता जनतेत जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करत आहोत.