Rahul Gandhi: तांत्रिक कारणाने राहुल गांधी यांचे दिल्लीचे उड्डाण रद्द, लातूरच्या हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात आज राहुल गांधींना मुक्काम करावा लागणार आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून विदर्भातील अमरावती मतदारसंघात त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर, सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या (Praniti shinde) प्रचारासाठीही त्यांनी सभा घेतली.आपल्या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोलही केला. त्यामुळे, राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारीही राहुल गांधींच्या सभेसाठी हजेरी लावली. सभेनंतर राहुल गांधींना लातूरमध्ये (Latur) मुक्काम करावा लागणार आहे. हवाई उड्डाणाचे तांत्रिक कारण देत राहुल गांधींच्या दिल्ली दौऱ्याचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन)
दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात आज राहुल गांधींना मुक्काम करावा लागणार आहे. संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्यामुळे त्यांना आज लातूरलाच मुक्काम करावा लागला. लातूर येथील ग्रँड हॉटेलमध्ये ते दाखल झाले आहेत. कळल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली. तसेच सुरक्षा यंत्रणेलाही मोठा ताण पडलेला आहे. कारण, राहुल गांधीना भेटण्यासाठी आलेले लातूरमधील काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख हे हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
राहुल गांधींच्या मुक्कामाची माहिती मिळताच जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते लातूरकडे धाव घेतानाचे चित्र दिसून येते. तर, लातूरच्या ग्रँड हॉटेलच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.