Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी
पण, नाही. त्यांच्यात ती धमक नाही. ते केवळ बोलतात.. मोठ्याने बोलतात. त्यांनी त्यासाठी मीडिया आपल्या नियंत्रणात ठेवला आहे. पण, वास्तव हे आहे की, देशातील जनता, संपूर्ण हिंदुस्तान आमच्यासोबत आहे, असे म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली आहे
लोक म्हणतात भाजप (BJP) आल्यानंतर संविधान बदलतील वगैरे वगैरे. पण, नाही. त्यांच्यात ती धमक नाही. ते केवळ बोलतात.. मोठ्याने बोलतात. त्यांनी त्यासाठी मीडिया आपल्या नियंत्रणात ठेवला आहे. पण, वास्तव हे आहे की, देशातील जनता, संपूर्ण हिंदुस्तान आमच्यासोबत आहे, असे म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली आहे. भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबई येथे संपत आहे. या यात्रेची सांगता मुंबई येथील शिवाजी पार्क येथील मैदानावरील सभेने होणार आहे. तत्पूर्वी ते मुंबई येथे बोलत होते. आरएसएस (RSS) आणि भारतीय जनता पक्ष यांची विचारसरणीच अशी आहे की, ते इतरांकडे काही ज्ञान आहे हे मनायलाच तयार नसतात. अधिकार पदावर असलेल्या केवळ एका व्यक्तीकडे ज्ञान आहे आणि बाकी इतरांकडे काहीच नाही, यावरच त्यांचे तत्वज्ञान आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.
भारतामध्ये प्रचंड प्रतिभा
राहुल गांधी यांनी या वेळी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा अशा दोन्ही यात्रांमधील अनुभव कथन केला. ते म्हणाले, देशामध्ये प्रचंड प्रमाणावर प्रतिभा आहे. इतकी की, जगभरातील विचारवंत, शास्त्रज्ञांकडे जेवढी क्षमता आणि ज्ञान आहे तेवढेच ज्ञान भारतातील शेतकरी आणि महिलांकडे आहे. फक्त ते ज्ञान वेगवळ्या प्रकारचे आहे. इतके की, एखाद्या बिडी तयार करणाऱ्या महिलेकच्या हातून 'मेक इन इंडिया' करायला हवे, त्यानंतर पाहा कशी मजा येते, असे म्हणत राहुल गांधी यांनी आपला नेमका रोख आणि आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दिशाही स्पष्ट केली. (हेही वाचा, Rahul Gandhi Shivaji Park Rally: राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथे सभा; महाविकासआघाडी फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग)
सर्वसमावेशक विचार आवश्यक
भारत जोडो यात्रे दरम्यान भारतभर फिरत असताना मला लक्षात आले की, लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. यातील असंख्य लोकांनी त्यांचे अनुभव मला कथन केले. छोटे व्यापारी, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील लोक. पण जेव्हा व्यापारी भेटत तेव्हा ते शेतकऱ्यांबद्दल कधीच बोलत नसत. ते फक्त स्वत:बद्दल बोलत असत. वास्तव हे आहे की, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे. त्यामुळे त्यात एकोपा दिसत नाही. सर्वांचा सर्वसमावेशकतेने विचार केला तरच बदल होणे शक्य आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी सर्वांनी एकत्र येण्याचे अवाहन केले. (हेही वाचा, Rahul Gandhi Thane Sabha: अदानी नव्हे 'मोदानी', विमानळ, पोर्ट, सगळी कंत्राटं एकाच व्यक्तीस; राहुल गांधी यांचे ठाणे येथून टीकास्त्र)
व्हिडिओ
दरम्यान, मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर आज सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेत राहुल गांधी काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीतील देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत.