पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंचा मास्टर पासवर्ड हॅक करून विद्यार्थ्यांचे गुण बेकायदेशीर पणे वाढवल्या प्रकरणी 4 जण अटकेत
काही विद्यार्थ्यांचे मार्क्स बेकायदेशीरपणे वाढवल्याप्रकरणी विद्यापीठाकडून 25 डिसेंबर 2019 ला फौजदार चावडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये (Punyashlok Ahilyadevi Holkar University) कुलगुरूंच्या कम्युटरचा मास्टर पासवर्ड हॅक करून काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभागाने कारवाई करत तत्कालीन संचालक सह 4 जणांना पोलिस कोठडीत ठेवले आहे. काही विद्यार्थ्यांचे मार्क्स बेकायदेशीरपणे वाढवल्याप्रकरणी विद्यापीठाकडून 25 डिसेंबर 2019 ला फौजदार चावडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सायबर पोलिसांकडे असून त्यांनी तपासामध्ये चौघांविरुद्ध सबळ पुरावे सादर केल्याची माहिती दिली आहे. तुम्ही सुद्धा 'हे' पासवर्ड वापरत आहात? सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमची गोपनिय माहिती होईल हॅक.
दरम्यान हा प्रकार फार्मसी महाविद्यालयातील आहे. या कॉलेजमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये बदल करून मार्क्स वाढण्यात आले. त्यासाठी कुलगुरूंच्या आयडीचा वापर करण्यात आला. विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन कमिटी स्थापन केली. या कमिटीच्या अहवालातून कुलगुरूंच्या नावाने खोटा आयडी आणि पासवर्ड बनवल्याची माहिती समोर आली. यानंतर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विद्यापीठाने पोलिसात गुन्हा दाखल केला.
सायबर क्राईमच्या पुराव्यावरून आता परीक्षा आणि मुल्यमापन मंडाळाचे तत्कालीन संचालक श्रींकात कोकरे, तत्कालीन यंत्रणा विश्लेषक प्रशांत चोरमले, ई-सुविधा समन्वयक हसन शेख, प्रोग्रामर प्रवीण गायकवाड या चौघांना अटक झाली आहे. त्यांना 22जानेवारीर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
दरम्यान आता ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवण्यात आले आहेत त्यांच्याविरोधात महाविद्यालय कोणती कारवाई करणार? हे पाहणं उत्सुकतेचे आहे.