Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक सुद्धू मूसेवाला यांच्यावर आज अंत्यसंस्कार; चाहत्यांची मोठी गर्दी
यात त्यांचे निकटवर्तीय, मित्र, नातेवाईक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पक्षाचे कार्यकर्ते आणि चाहत्यांचा समावेश आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांच्या निवास्थानी मोठी गर्दी लोटली आहे. यात त्यांचे निकटवर्तीय, मित्र, नातेवाईक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पक्षाचे कार्यकर्ते आणि चाहत्यांचा समावेश आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सिद्धू मूसेवाला यांची पंजाबमधील मानसा (Mansa) जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या (Sidhu Moose Wala Murder Case) करण्यात आली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निशेध करण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आज (31 मे) सकाळी 8.30 च्या सुमारास मूसेवाला यांच्या वडीलांना आपल्या मुलाचा (सिद्धू) मृतदेह मिळाला. जो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. हा मृतदेह त्यांचे जन्मगाव असलेल्या मानसा जिल्ह्यातील मूसा गावी नेण्यात आला. त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मूसा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजू गावकरी, परिसरातील नागरिक, चाहते आणि अनेकांनी मूसा गावात मोठी गर्दी केली आहे. मूसा यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजीही सुरु आहे. वमूसा येथे जमलेल्या उपस्थितांच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा समावेश आहे.
सिद्धू मूसावाला या नावाने ते परिचीत असले तरी त्यांचे मूळ नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते. पंजाब येथील मानसा जिल्ह्यात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. धक्कादायक म्हणजे पंजाबमध्ये सत्तास्थानी आलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने मूसावाला यांची सुरक्षा कमी केल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात मूसावाला यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी गायकाच्या हत्येची CBI, NIA चौकशी करण्याची केली मागणी)
वय वर्षे अवघे 28 असलेल्या मूसावाला यांनी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांची लढत आपचे उमेदवार विजय सिंगला यांच्यासोबत झाली. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पंजाब पोलिसांनी शनिवारी तात्पुरत्या आधारावर ज्यांची सुरक्षा काढून घेतली किंवा कमी केली अशा ४२४ लोकांमध्ये मूसवाला यांचा समावेश होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी सिद्धू मूसेवाला यांच्या निर्घृण हत्येची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.