Pune Zilha Parishad Job Offer: पुणे जिल्हा परिषद नोकर भर्ती, 1000 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र तरुणांना संधी
जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहेत.
तब्बल एक दशकाच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेतर्फे विविध पदांसाठी मोठी नोकर भर्ती ही होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी असून तब्बल 1000 रिक्त पदासाठी ही भर्ती होणार आहे. या भर्ती प्रकियेची सुरुवात देखील सुरुवात ही झाली आहे. या भर्ती प्रकियेत विविध पदासाठी नोकर भर्ती होणार आहे. यामध्ये आरोग्य परिवेक्षक, ड्रग्ज मॅनिफ्यक्चरींग अधिक्षक, लेबॉरेटरी तंत्रज्ञान, ग्राम सेवक, ज्युनिअर इंजिनीयर, ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर, वरिष्ठ असीस्टंट, ज्युनिअर असिस्टंट अशा अनेक रिक्त पदावर ही नोकर भर्ती होणार आहे. (हेही वाचा - Zilla Parishad Recruitment 2023: खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 19,460 पदांची मेगाभरती; उद्या निघणार जाहिरात, जाणून घ्या सविस्तर)
या नोकर भर्ती मध्ये 436 महिला आरोग्य सेवकांची भर्ती ही होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आरोग्य सेवकांची भर्ती होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या भर्ती प्रकियेसंबधात महत्त्वाची माहिती ही पुणे जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहे.
5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहेत.