पुणे: मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू

ही घटना पुण्यातील (Pune) बंडगार्डन (Bund Garden) रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ (Moboj Chowk) मंगळवारी पहाटे घडली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

मेट्रोचे (Metro) काम सुरु असताना क्रेनने उचलेली प्लेट अंगावर पडून एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील (Pune) बंडगार्डन (Bund Garden) रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ (Moboj Chowk) मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकावर गु्न्हा दाखल केला आहे. शहरात मेट्रोचे काम वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे. परंतु, बंडगार्डन या भागात मेट्रोचे काम रात्रपाळीत केले जाते. कारण, याठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरु असते.

उमेश बेसाहू श्याम असे अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. उमेश हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. नोकरीसाठी तो पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर त्याला मेट्रोच्या कामासाठी कामगार हवे आहेत, असे कळाले. त्यानंतर तो संबधित ठिकाणी जाऊन काम करत होता. उभेश हा रोजप्रमाणे सोमवारी संध्याकाळी कामाला गेला. त्यावेळी क्रेनच्या चालकाने क्रेन हायगयीने चालवून क्रेनने उचलेली प्लेट घसरून खाली पडली. त्यावेळी खाली उभा असलेला कामगार उमेश याच्या अंगावर ती प्लेट पडली. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- पुणे: सहलीतून परत असताना शालेय बसची ट्रॅक्टरला धडक; 15 विद्यार्थी जखमी 

याप्रकरणी पोलीस कर्मचारी रामचंद्र भोसले यांनी तक्रार दिली. त्यानुसार क्रेनचालक जितेंद्र उमा प्रजापती याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मेट्रोचे वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकात देखील मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्त्यावर दिवसा गर्दी असल्यामुळे रात्रपाळीत काम केले जाते.