IPL Auction 2025 Live

Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

सोबतच पुण्यात 31 जुलै पर्यन्त ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले आहे.

Pune Weather Prediction,July30: पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पुण्यात 31 जुलै पर्यन्त ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले आहे. मागील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाने पुणे शहराला चांगळच झोडपून काढलं आहे. धरणपाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार बॅटींग केल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. आणि यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्या खाली गेला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर ही 30 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.उर्वरित ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, या भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.