Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी आज यल्लो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज 29 जुलै रोजी ढगाळ वातावरणस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Mumbai Weather Prediction,July30: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी आज यल्लो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज 29 जुलै रोजी ढगाळ वातावरणस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) शहर आणि उपनगरात मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे, सोमवारी (आज) संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत मुंबईत  वेगळ्या-वेगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी दुपारी, IMD ने जाहीर केले की या आठवड्यात पावसाचा वेग कमी होण्याचा अंदाज आहे. हवामान अंदाजानुसार तापमान कमाल 30 अंश सेल्सिअस ते किमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. व मुंबईत सोमवार ते बुधवारपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.उर्वरित ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, या भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).