Pune Unlock: पुणेकरांना दिलासा! 14 जून पासून कोविड निर्बंध होणार अधिक शिथिल; पहा काय सुरु काय बंद?

पुण्यामध्ये या निर्बंधात आणखी शिथिलता देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार घेतला आहे.

Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोविड-19 लॉकडाऊनचे (Covid-19 Lockdown) नियम शिथिल करत 7 जून पासून राज्यात अनलॉकला (Unlock) सुरुवात झाली. पुण्यामध्ये (Pune) या निर्बंधात आणखी शिथिलता देण्यात येणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंध शिथिलीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवार, 14 जून पासून पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार असून काय सुरु राहणार आणि काय बंद, याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून)

काय सुरु?

# अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु.

# अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु.

# मॉल्स 50 टक्के क्षमतेने खुले करण्यास मुभा.

# रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु. पार्सल सेवारात्री 11 पर्यंत सुरु राहतील.

# सार्वजनिक वाचनालय.

# कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था 50% क्षमतेने.

# व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा देखील 50% क्षमतेने खुली करण्यास मुभा. (पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील, मात्र AC सुविधा वापरता येणार नाही)

# मद्य विक्रीची दुकाने .सर्व दिवस सुरु.

# उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सुरु (सकाळी 5 ते 9 आणि दुपारी 4 ते सायं. 7 पर्यंत)

# कोविड विषयक कार्य करणारी शासकीय कार्यालये 100% क्षमतेने सुरु राहतील.

# इतर सरकारी कार्यालये 50% क्षमतेने कार्यरत असतील.

# सर्व आउटडोअर आणि इनडोअर स्पोटर्स सर्व दिवस सुरु. (सकाळी 5 ते 9 आणि सायं. 5 ते 7 पर्यंत)

# सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत सायं. 7 पर्यंत करण्यास परवानगी.

# लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी.

# अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रमांसाठी 20 लोकांच्या उपस्थितीस मुभा.

# विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था सभांसाठी 50% लोकांच्या उपस्थितीस परवानगी.

# ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याची परवानगी.

# बांधकामांना परवानगी.

मुरलीधर मोहोळ ट्विट्स:

काय बंद?

# मॉल्स खुले करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सिनेमागृह, नाट्यगृह मात्र पूर्णपणे राहतील.

# अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने शनिवार-रविवार पूर्णपणे बंद.

दरम्यान, पुण्याचा पॉझिटीव्हीटी रेट 5 च्या खाली आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. बदलेले हे नियम केवळ पुणे शहरासाठी लागू होणार असून पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंधांमध्ये सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif