Pune Traffic Advisory For April 14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात कॅम्प, विश्रांतवाडीसह अनेक ठिकाणी 14 एप्रिल रोजी वाहतूक बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
हे बदल प्रामुख्याने पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रांतवाडी, दांडेकर पुल आणि पुणे कॅम्पमधील अरोरा टॉवर्स चौक परिसरात असतील. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य मेळावे होतील. माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे निर्बंध लागू असतील.
पुणे (Pune) शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025) वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये काही रस्ते बंद असतील तर काही ठिकाणी वाहतूक वळवली जाईल. हे बदल प्रामुख्याने पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रांतवाडी, दांडेकर पुल आणि पुणे कॅम्पमधील अरोरा टॉवर्स चौक परिसरात असतील. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य मेळावे होतील. माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे निर्बंध लागू असतील.
सोमवार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने समाजातील सर्व स्तरातील नागरीक पुणे शहर व बाहेर गावाहून मोठया प्रमाणात मिरवणूकीने व निरनिराळे वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथील पुतळा, अरोरा टॉवर चौकातील पुतळा, विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा व कळसफाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात येत असतात. सदर मिरवणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे दोन्ही बाजूस गर्दी होत असते, त्यामुळे सदर ठिकाणांवर वाहन चालकांची गैरसोय होऊ नये व वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे राहणे करिता आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर:
शाहिर अमर शेख चौक- शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
आ.टी.ओ. चौक- आर.टी.ओ चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- आर.टी.ओ चौकाकडून सरळ जहांगीर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील व शाहीर अमर शेख चौकातून कुंभारवेस मार्गे इच्छित स्थळी जातील.
जीपीओ चौक- जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- जीपीओ चौकातून बोल्हाई/मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
पुणे स्टेशन चौक- पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- पुणे स्टेशन-अलंकार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
नरपतगिरी चौक- नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- नरपतगिरी चौक-15 ऑगस्ट चौक- कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
बॅनर्जी चौक- बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील.
ससुन हॉस्पीटल येथील अत्यावश्यक रुग्णांसाठी मार्ग- ससुन हॉस्पीटल येथील डेड हाऊस शेजारील गेटने प्रवेश देण्यात येत आहे.
वरील नमूद वाहतूक व्यवस्थेतील बदल हे दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी 6 वा.पासुन गर्दी संपेपर्यंत तात्पुरते अंमलात राहतील.
पार्किंग व्यवस्थेबाबत-
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास अभिवादन करावयास येणा-या भाविकांच्या वाहनांकरीता आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी. एम. एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने), व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा: Metro Corridor Between Shivajinagar and Hinjewadi: शिवाजीनगर आणि हिंजवडी यांना जोडणारी पुणे मेट्रो लाईन-3 पूर्ण होण्यासाठी आणखी अवधी लागणार)
अरोरा टॉवर परिसर-
डॉ. कोयाजी रोड/तीन तोफा चौक- डॉ. कोयाजी रोड वरुन (सिल्व्हर जुबली मोटर्स) नेहरु चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- डॉ. कोयाजी रोड-तीन तोफा चौक-एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी
ईस्कॉन मंदिर चौक- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ईस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- एस. बी. आय. हाऊस चौक तीन तोफा चौक-डॉ. कोयाजी रोड मार्गे इच्छितस्थळी
नेहरु चौक- नेहरु चौकाकडुन तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतुक नेहरु चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- नेहरु चौकातून किराड चौक- ब्ल्यु नाईल चौक एस.बी.आय. हाऊस मार्गे इच्छितस्थळी
नाझ चौक- महात्मा गांधी रोडवरुन नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक नाझ चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- नाझ चौक डावीकडे वळून बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छितस्थळी
पार्किंग व्यवस्थेबाबत-
दोराबजी चौक ते अरोरा टॉवर ते तीन तोफा चौक व अरोरा टॉवर ते नाझ चौक, तारापोर रोड जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारचे वाहनांकरीता नो पार्किंग करण्यात येत आहे.
Pune Traffic Advisory For April 14:
अरोरा टॉवर चौकातील डॉ. आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-ॲण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.
सिंहगड रोड जंक्शन (दांडेकर पुल) परिसर-
स्वारगेटकडून सिंहगड रोडला जाणारी वाहतुक- सावरकर चौक ते थोरले बाजीराव पेशवे पथ (सणस मैदान पथ कॉर्नर) ते कल्पना हॉटेल चौक ते ना. सी. फडके ते मांगीरबाबा चौक ते सेनादत्त पोलीस चौकी चौक ते बालशिवाजी ते आशा हॉटेल चौकातुन सिंहगड रोडकडे.
सिंहगडरोडकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतुक- आशा हॉटेल चौकातून डावीकडे वळून ते बालशिवाजी ते सेना दत्त पोलीस चौकी चौक ते मांगीरबाबा चौक ते ना.सी. फडके चौक ते कल्पना हॉटेल चौक ते सणस पुतळा चौक सोयीनुसार
शास्त्रीरोडकडून येणारी वाहतूक- सेनादत्त चौकाकडून येणारे वाहने डावीकडे मांगीर बाबाचौकाकडून ना. सी. फडके चौकाकडे पुढे जातील.
बाजीराव रोड-
बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक- पुरम चौकातुन बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग- पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक- खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
गणेश रोड-
लाल महल चौकातुन गणेश रोडने जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग- कमला नेहरु हॉस्पीटलकडून गणेश रोडला येणारी वाहतूक लक्ष्मी रोड मार्गे इच्छितस्थळी जाईल. सोन्या मारुती चौकाकडून फडके हौद चौकात येणारी वाहतूक लक्ष्मी रोड मार्गे जाईल. पवळे चौकाकडून फडके हौद चौकात येणारी वाहने ही अगरवाल रोडने जातील.
याखेरीज पुणे शहरात अनेक ठिकाणाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापर्यंत मिरवणूका निघणार असल्याने, मिरवणूक मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार/टप्या-टप्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)