Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांना दिलासा! FLY91 ने सुरु केली पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा, जाणून घ्या वेळा

लोकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच मीटिंग्स, कॉन्फरन्स इ. गोष्टींसाठी गोव्याला जाणाऱ्या लोकांनाही मदत होईल. यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Flights | (Photo Credit - X/ANI)

Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांसाठी (Pune) एक दिलासादायक बाब आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, FLY91 या भारताच्या प्रादेशिक एअरलाइनने, पुणे-गोवा (Pune to Goa) आणि पुणे-जळगाव (Pune to Jalgaon) या मार्गावर थेट दैनंदिन उड्डाणे सुरु केली आहेत. कंपनीने 27 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु केली. यामुळे दोन्ही क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुण्यापासून दोन मार्गांवर दैनंदिन उड्डाणे सुरू केल्याने, पुणेकरांसाठी सोयीस्कर थेट आउटबाउंड हवाई प्रवासाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

पुणे-गोवा मार्गामुळे विद्यार्थी आणि सहलीसाठी देशातील सुट्टीचे प्रमुख ठिकाण असलेल्या गोव्याला जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच मीटिंग्स, कॉन्फरन्स इ. गोष्टींसाठी गोव्याला जाणाऱ्या लोकांनाही मदत होईल. यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

फ्लाइट वेळापत्रक-

पुणे ते गोवा-

निर्गमन: सकाळी 11:55 | आगमन: दुपारी 1:20 वा.

दिवस: सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र

निर्गमन: सकाळी 10:50 | आगमन: दुपारी 12:10 वा.

दिवस: शनि, रवि

गोवा ते पुणे-

निर्गमन: सकाळी 10:20 | आगमन: सकाळी 11:35

दिवस: सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र

निर्गमन: सकाळी 6:05 | आगमन: सकाळी 7:20 वा.दिवस:

शनि, रवि

पुणे ते जळगाव-

निर्गमन: दुपारी 3:50 | आगमन: संध्याकाळी 5:15 वा.

दिवस: सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, रवि

निर्गमन: संध्याकाळी 4:45 | आगमन: संध्याकाळी 6:05 वा.

दिवस: शनि

जळगाव ते पुणे-

निर्गमन: दुपारी 2:10 | आगमन: दुपारी 3:30 वा.

दिवस: सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, रवि

निर्गमन: दुपारी 2:50 | आगमन: दुपारी 4:15 वा.

दिवस: शनि

पुणे-जळगाव मार्गामुळे युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा आणि एलोरा लेण्यांना भेट देणारे लोक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मदत होईल. याबाबत FLY91 चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको म्हणाले, ‘पुणे-गोवा-पुणे आणि पुणे-जळगाव-पुणे मार्गांवरील दैनंदिन उड्डाणे सुरू होणे ही बाब, FLY91 ची देशभरातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे, छोट्या शहरांमधील व्यापार आणि आर्थिक विकासाला समृद्धी मिळेल.’ (हेही वाचा: BEST च्या Minibuses 20 दिवसांपासून बंद, सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल; आर्थिक अडचणींमुळे कंत्राटदाराने मिनीबस पुरवण्यास दर्शवली असमर्थता)

वरील दोन्ही मार्गांव्यतिरिक्त, FLY91 आठवड्यातून दोनदा पुणे-सिंधुदुर्ग मार्गावर आपली विमाने सुरू ठेवेल. सध्या FLY91 गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळला महाराष्ट्रातील पुणे, जळगाव आणि सिंधुदुर्ग, तसेच लक्षद्वीपमधील अगट्टी आणि हैदराबाद सारख्या शहरांना जोडते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif