Pune To Be Bigger City Than Mumbai: महाराष्ट्रात जन्मले मुंबई पेक्षा मोठे शहर; पुणे होणार ‘महापुणे’

पुणे महापालिका हद्दवाढीत समाविष्ठ होणारी गावे पुढीलप्रमाणे- काळेवाडी, वडाची वाडी, बावधन बुद्रूक, खडकवासला, म्हाळुंगे, सूस, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे, पिसोळी, शेवाळवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, सणसनगर, नांदोशी.

BMC, PMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजधानीचे शहर असलेली मुंबई (Mumbai) आता वाढत्या नागरीकरणामुळे आक्राळविक्राळ रुप धाकरण कर आहे. मुंबईची महामुंबई झाली. आता या मुंबईचे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतानाच आता महाराष्ट्रात आणखी एक महाकाय शहर जन्माला आले आहे. विशेष म्हणजे हे शहर आता मुंबई (Mumbai City) शहरापेक्षाही मोठे (Pune To Be Bigger City Than Mumbai) आहे. होय, या शहराचे नाव पुणे (Pune) असे आहे. परंतू, लवकरच हे पुणे 'महापुणे' (Mahapune) ठरणार आहे. पुणे (Pune City) महापालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुणे लगतच्या 23 गावांचा समावेश आता पुणे महापालिका हद्दीत होणार आहे. त्यामुळे पुण्याची सीमा आता चांगलीच वाढली आहे.

राज्य सरकारने पुणे शहराच्या हद्दवाढीबाबतची अधिसूचना बुधवारी (23 डिसेंबर) प्रसीद्ध केली. या हद्दवाढीत पुणे लगतच्या 23 गावांचा समावेश करण्यात आला. सरकारने अधिसूचना काढण्यात मोठी चपळाई दाखवली. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांपैकी तीन गांवांची निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती परंतू, उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबतची ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर अवघ्या 24 तासात राज्य सरकारने पुणे महापालिका हद्दवाढीबाबात अधिसूचना काढली. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साता-याच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला दिली मंजूरी)

पुणे महापालिका हद्दवाढीत समाविष्ठ होणारी गावे

काळेवाडी, वडाची वाडी, बावधन बुद्रूक, खडकवासला, म्हाळुंगे, सूस, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे, पिसोळी, शेवाळवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, सणसनगर, नांदोशी

मुंबई शहराचे आजचे क्षेत्रफळ सुमारे 440 ते 450 चौरस किलोमटर इतके आहे. तर पुणे शहराचे आजचे क्षेत्रफळ ३३१.५७ चौरस किलोमीटर इतके असल्याचे सांगितले जाते. पुणे महापालिकेत नव्याने वाढलेल्या 24 गावांमुळे पुणे शहराची हद्द महसूल विभागाच्या दाव्यानुसार 516 चौरस किलोमीटर इतकी वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाकाय शहर जन्माला येऊ घातले आहे.