पुणे: महिलांचा वेश धारण करुन चोरट्यांनी फोडली ATM मशिन; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात असलेलं एटीएम चोरट्यांची दोरीच्या साहाय्याने फोडलं
पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिरुर (Shirur) तालुक्यातील शिक्रापूर (Shikrapur) येथील पाबळ चौक (Pabal Chowk) परिसरात असलेलं एटीएम (ATM) चोरट्यांची दोरीच्या साहाय्याने फोडलं आहे. महिलांचा वेश धारण करुन चोरटे एटीएम मध्ये शिरले त्यानंतर त्यांनी दोरीच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद्य झाला आहे. हे एटीएम स्टेट बँक ऑफ इंडियाचं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिरुर तालुक्यात एटीएम चोरीच्या घटना सुरुच आहेत.
या एटीएम मशिनमध्ये 19 लाख 50 हजार रुपयांची रक्कम होती. दोरी बांधून एटीएम मशीन फोडून त्यानंतर ते कारमधून लंपास करण्यात आलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या एटीएम मशिन चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (डोंबिवलीत अज्ञात व्यक्तीकडून बँकेचे ATM तोडण्याचा प्रयत्न फसला)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.45 च्या दरम्यान 3 लोक एटीएम बाहेर आले. त्यांनी महिलांचा वेश धारण केला होता. त्यांनी दोरीच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून लंपास केले. विशेष म्हणजे या मशिनची किंमत 2.5 लाख इतकी आहे. दरम्यान, चोरी झाली तेव्हा एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (सावधान! एटीएममधून पैसे काढायला जाताय? त्याआधी महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ नक्की बघा)
यापूर्वी देखील एटीएम फोडीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात पुण्यात सह इतरत्र चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.