Pune: बायकोला शरीरसंबंधासाठी मित्रांच्या हवाली करुन पती पाहात राहिला, 48 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन पुण्यात गुन्हा दाखल

ज्या नवऱ्यासोबत गेली अनेक वर्षे संसार केला त्याच नवऱ्याने पत्नीच्या देहाचा बाजार मांडला. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidhyapeeth Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे.

Unnatural Sex | (File Image)

पुणे (Pune) शहरात मानवी विकृतीचा एक धक्कादाय प्रकार पुढे आला आहे. ज्या नवऱ्यासोबत गेली अनेक वर्षे संसार केला त्याच नवऱ्याने पत्नीच्या देहाचा बाजार मांडला. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidhyapeeth Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार पिडिता ही आरोपीची पत्नी आहे. आरोपींने आपल्या 48 वर्षीय पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतके करुनही तो थांबला नाही तर त्याचे मित्र हे संबंध ठेवत असताना त्याच खोलीत हा विकृत पती हे कृत्य पाहात थांबला होता.

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, पतीचे असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही त्याने अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे. यापूर्वी 2020 मध्येही त्याने आपली इच्छा नसताना आपल्याला बळजबरीने तो हडपसर येथील एका लॉजवर नेले. तेथे त्याने त्याच्या एका मित्रासोबत आपल्याला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धक्कादायक म्हणजे हे सर्व कृत्य सुरु असताना पती खोलीतच उभा राहून हे सर्व पाहात होता. (हेही वाचा, Unnatural Sex: पत्नीच्या गुप्तांगाला चावणाऱ्या पतीची दातकवळी कोर्टाकडून जप्त, खटलाही सुरु)

पीडितेने पुढे म्हटले आहे की, हा धक्कादायक प्रकार इतक्यावरच थांबला नाही जुलै 2021 मध्येही आपल्याला परत हडपसर येथील कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर नेण्यात आले. तेथेही मित्रासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास आपल्याला भाग पाडण्यात आले. याही वेळी आरोपी (पती) तिथेच थांबून हे सर्व घडताना पाहात होता. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून आपण तक्रार देत असल्याचे महिलेने म्हटले आहे. पोलिसानी महिलेच्या तक्रारीवरुन पती आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.