Dagdusheth Ganpati Kirnotsav 2021: माघी गणेश जयंतीच्या पूर्वी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पार पडला यंदाचा किरणोत्सव; पहा या क्षणाचा व्हिडिओ (Watch Video)
यावर्षी गणेश जयंती 15 फेब्रुवारी दिवशी पार पडणार आहे.
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये (Dagdusheth Ganpati Mandir) आज किरणोत्सवाचा (Dagdusheth Ganpati Kirnotsav) तिसरा दिवस पार पडला आहे. आज तिसर्या दिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटां नी सूर्य किरणं मंदिरामध्ये आली आहेत. ज्या वेळेस बाप्पाच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणं पडली तेव्हा मंदिरात भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. दरवर्षी माघ गणेश जयंतीच्या आधी उत्तरायणामधील सूर्यकिरणं गणेश मूर्तीला स्नान घालतात. यावर्षी गणेश जयंती 15 फेब्रुवारी दिवशी पार पडणार आहे.
दगडूशेठ गणेश मंदिरामध्ये आज गणेश मूर्तीसोबत सिद्धी आणि रिद्धी या देवतांच्या मूर्तीवरही सूर्य किरणं पडली. हा मंगलमय सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिरामध्ये हजेरी लावली होती.
दगडूशेठ गणपती किरणोत्सव सोहळा 2021
पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्व दिशेला तोंड करणारे आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये गणेश मूर्तीवर उत्तरायणामध्ये थेट सूर्याची किरण पडताना पहायला मिळतात. Maghi Ganesh Jayanti 2021 Invitations: माघी गणेश जयंती निमित्त घरी बाप्पाच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, HD Images.
माघी गणेश जयंती हा श्री गणेश देवताचा जन्मदिन असल्याने या निमित्ताने राज्यभरात गणपती मंदिरामध्ये तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी घराघरामध्ये माघी गणेशोत्सवाच्या निमित्त गणपतीची मूर्ती विराजमान करतात आणि दीड दिवसाने त्याचं विसर्जन करतात.