Pune Shocker: पिंपरी चिंचवड मध्ये प्रेमभंगातून प्रेयसीच्या 7 वर्षांच्या भावाचं अपहरण करून निर्घुण खून; आरोपी अटकेत

पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आदित्य ज्या सोसायटीमध्ये राहत होता तेथेच मुख्य आरोपी मंथन किरण भोसले देखिल राहत होता.

Murder | (Photo Credits: PixaBay)

प्रेमभंगाच्या रागा मधून पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मध्ये एका युवकाने आपल्या प्रेयसीच्या 7 वर्षीय भावाचाच जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य आगले (Aditya Aagale) असं या मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर यांना अटक केली आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडीयामध्ये आदित्य आगले बेपत्ता असल्याची पोस्ट फिरत होती. आदित्यचा काही ठावठिकाणा लागला तर कळवा असं कळकळीचं आवाहन करण्यात आले होते अनेकांनी ही पोस्ट शेअर केली होती पण आता काल आदित्य बाबत अप्रिय बातमी समोर आली. आदित्यचा मृतदेह भोसरी MIDC परिसरात आढळून आला.

दरम्यान गुरूवारपासून आदित्य बेपत्ता होता. पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आदित्य ज्या सोसायटीमध्ये राहत होता तेथेच मुख्य आरोपी मंथन किरण भोसले देखिल राहत होता. आदित्यच्या बहिणीवर किरणचे प्रेम जडले होते. पण कुटुंबियांचा त्याला विरोध होता. या रागातून किरणने प्रेयसीच्या कुटुंबाला धडा शिकवण्याच्या रागात आदित्यचं अपहरण करून त्याचा जीव घेतला. हे देखील नक्की वाचा: नांदेड: प्रेमभंग झाल्याने प्रियकराकडून प्रेयसीची चाकूने गळा चिरुन हत्या .

गुरूवारी संध्याकाळी आदित्य खेळायला आला तेव्हा किरणने डाव साधला. त्याला गाडी जवळ बोलावून घेतले. त्याला आतमध्ये घेऊन त्याचं नाक, तोंड दाबलं आणि तेथेच त्याला ठार केले. यानंतर आगले कुटुंबियांना त्याने व्हॉट्सअ‍ॅप वर 20 कोटींची खंडणी मागितली. यानंतर पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचून सारा प्रकार जाणून घेतला आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement