पुणे: ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन

अनंत दीक्षित यांनी पत्रकारिता आणि संपादकीय जबाबदारी यांतून त्यांनी निवृत्ती घेतली तरीही ते लेखन क्षेत्रात कायम कार्यरत होते. पत्रकारितेतील अनेक तरुणांना त्यांनी उर्जा पुरवली. त्यांच्या मागे पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Ananth Dixit | (Photo Credits: YouTube screenshot)

ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संपादक अनंत दीक्षित (Ananth Dixit) यांचे पुणे येथे निधन (Ananth Dixit Dies) झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. गेले प्रदीर्घ काळ ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. अखेर त्यांनी पुणे (Pune) येथे अखेरचा श्वास घेतला.

दीक्षित यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका जाणत्या आणि अभ्यासू संपादकाला मुकल्याची प्रतिक्रिया पत्रकारिता आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार, संपादक अशी त्यांची ख्याती होती. मराठीतील मातब्बल दैनिके, मासिकांसाठी अनंत दीक्षित यांनी पत्रकारिता केली. संपादकीय जबाबदारी पेलली. (हेही वाचा, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

अनंत दीक्षित यांनी पत्रकारिता आणि संपादकीय जबाबदारी यांतून त्यांनी निवृत्ती घेतली तरीही ते लेखन क्षेत्रात कायम कार्यरत होते. पत्रकारितेतील अनेक तरुणांना त्यांनी उर्जा पुरवली. त्यांच्या मागे पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement