Pune Road Rage: पुणे येथील रोड रेज प्रकरणी एकास अटक; महिलेला केली होती बेदम मारहण
आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरुन निघालेल्या महिलेला साईड न दिल्याच्या कारणास्तव काही आरोपींनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पीडितेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरपीस अटक केली आहे.
पुणे रोड रेज (Pune Road Rage) प्रकरणात कथीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरुन निघालेल्या महिलेला साईड न दिल्याच्या कारणास्तव काही आरोपींनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पीडितेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरपीस अटक केली आहे. स्वप्नील केकरे असे आरोपीचे नाव आहे. रस्त्यावरुन जाताना तो महिलेच्या स्कूटरला ओव्हरटेक करू शकला नाही म्हणून संतप्त झाल्याने त्याने हिंसक कृत्य केल्याची प्राथमिक माहती आहे.
महिलेच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव
स्वप्नील केकरे याने महिलेचे केस ओढले. तिला दोनदा असा जोराचा ठोसा दिला की तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. डिजिटल कंटेंट क्रिएटर असलेल्या जेर्लिन डिसिल्वा या पीडित महिलेने सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये तिचा अनुभव शेअर केला आहे. ज्यामध्ये पुणे शहरातील गुन्हेगारी किती वाढली आहे याचे दर्शन होते. जर्लिनने सांगितले की ती पाषाण-बाणेर लिंक रोडवर होती जेव्हा एका कारमधील एक माणूस तिचा जवळपास दोन किलोमीटरपासून पाटलाग करत होता. कारला अडथळा येऊ नये म्हणून ती रस्त्याच्या डाव्या बाजूने तिची स्कुटी हाकत होती. आरोपीला ओव्हरटेक करण्यासाठी तिने पूर्ण बाजू मोकळी दिली होती. असे असतानाही त्याने तिचा दोन किलोमीटर पाटलाग केला आणि आणि तिच्या स्कूटरसमोर अचानक थांबवली आणि तिला मारहाण सुरु केली. (हेही वाचा, Pune Crime: पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला बेदम मारहाण (Watch Video))
पीडितेकडून सोशल मीडियावर व्हिडओ शेअर
पीडितेने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, तो (आरोपी) खूप रागाने गाडीतून उतरला. त्याने मला दोनदा धक्काबुक्की केली आणि माझे केस ओढले. माझ्यासोबत दोन मुलं होती. त्याला त्यांची काळजी नव्हती. हे शहर किती सुरक्षित आहे? लोक वेड्यासारखे का वागत आहेत? मला दोन मुले होती. मला काहीही होऊ शकले असते.. एका महिलेने मला मदत केली. डिसिल्व्हा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या नाकातोंडाभोवती रक्त असल्याचे पाहायला मिळते. (हेही वाचा, Pune Shocker: वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुणे येथील धक्कादायक प्रकार; आरोपीस अटक)
जर्लिनच्या व्हिडिओनंतर पोलिसांनी स्वप्नील केकरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे रस्ता सुरक्षेबाबत आणि पुण्यातील रस्त्यांवरील आक्रमक वर्तनाबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
व्हिडिओ
पुण्यात हिट अँड रन
पाठिमागील काही दिवसांपासून पुणे सातत्याने अपघात, हिट अँड रन आणि रोड रेजच्या घटनांनी चर्चेत आहे. अगदी अलिकडेच एका 17 वर्षांच्या मुलाने, कथितपणे दारूच्या नशेत, त्याची पोर्श बेदरकारपणे हाकली. ज्यामुळे दोन 24-वर्षीय तंत्रज्ञ कारखाली चिरडले गेले. ज्यामध्ये त्यांचा तात्काळ मृत्यू झाला. हा मुलगा सध्या जामिनावर बाहेर आहे. याव्यतिरिक्त, गेल्या आठवड्यात, एका राजकारण्याच्या कथितपणे मद्यधुंद मुलाने त्याच्या एसयूव्हीमध्ये वेगाने जात असताना कोंबड्या गेऊन जाणाऱ्या वाहनाला धडक दिली, त्यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. तो घटनास्थळावरून पळून गेला पण नंतर त्याला पकडण्यात आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.